लोहारा आणि उमरगा येथे हाणामारी 

 

लोहारा  : आरोपी नामे-1)विष्णु भिमराव नारायणकर,2) नितीन भिमराव नारायणकर, 3) शाम भिमराव नारायणकर तिघे रा. विरशैव कक्क्या नगर लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.20.09.2023 रोजी 14.00 वा. सु. लोहारा येथे हॉटेल शिवाजी समोर गणपती मुर्ती बसविण्याचे ठिकाणाचे कारणावरुन फिर्यादी नामे- राहुल राजेंद्र कोकणे, वय 30 वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा जि. धाराशिव यांना शिवीगाळ करुन स्टीलच्या पाईपने मारहाण करुन फिर्यादीचे फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन तोडून घेवून गेला. तसेच राहुल कोकणे यांचा भाउ त्यांचे बचावास आला असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल कोकणे यांनी दि.22.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 327, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1)सिध्दु जमादार, रा. धाकटीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव, अनोळखी एक यांनी दि.22.09.2023 रोजी 08.45 वा. सु. सिमा तपासणी नाका धाकटेवाडी ता. उमरगा येथे  फिर्यादी नामे- श्रीकांत शंकर शिंदे, वय 40 वर्षे, व्यवसाय मोटार वाहन निरीक्षक उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव रा. डी.सी.अजमेरा होम आदर्श नगर बार्शी नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीतांनी मोटार परिवहन विभागाचे अंतर्गत येत असलेले तलमोड चेकपोस्ट येथे मोटार वाहन क्र एमएच 25 एजे 3617 चे चालकाला त्याची गाडी आडवून त्यांच्याकडून 500 रुपये मागून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी श्रीकांत शिंदे यांनी दि.22.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 341, 387, 504, 506, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शेतातील विहीरीवर लावलेली मोटर चोरीस 

तुळजापूर  : फिर्यादी नामे- धनंजय हरिश्चंद्र बगडी, वय 50 वर्षे, रा. मंकावती गल्ली, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे हंगरगा तुळ शिवारातील शेतातील विहीरीवर लावलेली 03 एचपी ची मोटर अंदाजे 6,000 ₹, फिनोलेक्स कंपनीचे 19 स्प्रिंकलर नोझल अंदाजे 15,500₹, 50 फुट केबल 2,500₹ असा एकुण 24,000₹ किंमतीचा माल हा दि. 21.09.2023 रोजी 19.00 ते दि. 22.09.2023 रोजी 08.00 वा. सु.  अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी धनंजय बगडी यांनी दि.22.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.