आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

उस्मानाबाद -  जुने बस आगार, उस्मानाबाद येथील कालींदा पवार, उषाबाई पवार, धनाजी काळे, आकुलीबाई काळे, निर्मला काळे यांचा गल्लीतीलच- विकास सखाराम काळे यांच्या कुटूंबीयांशी जुना वाद आहे. यातून नमूद लोक विकास यांच्या पत्नीशी वारंवार भांडण तंटे करत असल्याने त्या त्रासास कंटाळून दि. 02.12.2021 रोजी 20.00 वा. सु. विकास यांच्या पत्नीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या विकास काळे यांनी दि. 31.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

तुळजापूर : तुळजापूर येथील प्रशांत दत्तात्रय कांबळे, रा. तुळजापूर हे मित्रासह दि. 28.12.2021 रोजी 08.41 वा. सु. तुळजापूर येथील पांडुरंग नगर येथील रस्त्याने मोटारसायकलने जात होते. यावेळी गावकरी- राजेंद्र दिगंबर माने यांसह एक अनोळखी पुरुषाने प्रशांत कांबळे यांना आडवून जुना वाद उकरुन काढून प्रशांत कांबळे यांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लोखंडी गज डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रशांत कांबळे यांनी दि. 31 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 294, 324, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अंबी  : अलेश्वर, ता. परंडा येथील किरण तुळशीराम भोई हे आपल्या पित्यासह दि. 31.12.2021 रोजी 10.30 वा. सु. मोटारसायकलने त्यांच्या शेतात जात होते. यावेळी भाऊबंद- निलेश भोई, महावीर भोई, सागर भोई, कैलास भोई यांनी सिना कोळेगाव धरनातील मच्छी व्यवसायाच्या परवान्याच्या कारणावरुन किरण यांसह त्यांच्या पित्यास शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, धारदार शस्त्राने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या किरण भोई यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.