प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

 

तुळजापूर  : आरोपी नामे- 1)बालाजी बब्रुवान हावळे,वय 38 वर्षे, रा हंगरगा तुळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, आरोपी नामे 2) कलीम सत्तार कुरेशी, वय 38 वर्षे, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  यांनी  दि.16.08.2023 रोजी 13.30 वा.सु. बारुळ पाटीजवळ पिकअप क्र एमएच 25 पी 3718 मध्ये एक छोटी कारवड, एक खिलारा खोंड, एक रेडा सह पिकअप वाहन असा एकुण 2,20,000 ₹ किंमतीची जनावरे सह पिकअप मध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावराची निर्दयतेने बांधून घेवून वाहतुक करत असतांना तुळजापूर पो. ठाणे च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांचा छळ कायदा कलम 11 (1) (के) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5,5(अ), 5(ब) सह मो.वा.का. 83, 177  अन्वये  तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

मुरुम  : आरोपी नामे- 1)ईश्वर मनोहर राठोड, वय 29 वर्षे, रा. नाईकनगर ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.16.08.2023 रोजी 18.30 वा सुमारास नाईकनगर तांड्यात माणिक मन्नु आडे यांचे शेडसमोरील रोडवर सार्वजनिक ठिकाणी रोडवर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये पो.ठाणे मुरुम येथे गुन्हा नोंदवला आहे.