भूम :  पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटक 

 

धाराशिव  -  हिवरा, ता. भुम या ठिकाणी मेहंदी रंगाचा काळेपांढरे ठिपके असलेला  शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परीधान केलेला इसमाचे कमरेला बंदुक सारखे काहीतरी शस्त्र आहे, अशी माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपीस  अटक केली आहे. 

आज दि.06.07.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गुप्त बातबीदारामार्फत माहिती मिळाली की, हिवरा, ता. भुम या ठिकाणी मेहंदी रंगाचा काळेपांढरे ठिपके असलेला  शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परीधान केलेला इसमाचे कमरेला बंदुक सारखे काहीतरी शस्त्र आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने  यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मा. पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव यांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावून मिळालेल्या  बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेशित दिले. 

त्यानंतर पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून 16.30 वा नमुद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवून त्याचे नवा गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश मच्छिंद्र काळे, वय 20 वर्षे, रा. हिवरा, ता. भुम जि. उस्मानाबाद असे  सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 41,000 ₹ किंमतीचे देशी बनावटीचे पिसटल व दोन जिवंत काडतुस मिळून आले. यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त करुन त्याचेविरुध्द पोलीस ठाणे भुम या ठिकाणी श्स्त्र अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी .पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव, सपोनि शॅलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार विनोद जानराव, निंबाळकर, फराहान पठाण, नोलीस नाईक/1479 जाधवर, 1611/जाधवर यांचे पथकाने केली