आयपीएल क्रिकेट मॅचवर धाराशिवमध्ये सट्टा 

मुंबईच्या दलालांविरुद्ध  धाराशिवमध्ये गुन्हा दाखल 
 

धाराशिव  : अ/303 अमिशा अपार्टमेंट, लक्ष्मण म्हात्रे रोड, दहिसर पश्विम, मुंबई ग्रामस्थ-भव्य चैतन्य दवे, वय 25 वर्षे यांनी दि. 06.05.2023 रोजी 20.00 वा. सु. बस स्थानक जवळील हॉटेल प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉज मध्ये मुंबई इ्ंडियन्स विरुध्द चेन्नई आणि रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुध्द डेल्ही कॅपीटल्स या दोन संघादरम्यान चालु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा (बेटींग) जुगार चालविला.

तसेच सट्टा चालविण्या करीता आशिश्‍ नेवारे रा नागपूर यांच्याकडून खोटे सांगून त्यांचे आधारकार्ड व सिमकार्ड घेऊन  सिमकार्डचा वापर करुन फोनद्वारे व्हॉटसअपद्वारे क्रिकेट सट्टा चालवून प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉज मध्ये राहण्याकरीता स्वताची ओळख लपविण्याचे उद्देशाने बनावट आधारकार्ड देऊन फसवणूक केली. अशा मजकुराच्या उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार- हुसेन नसीर खान सय्यद यांनी दि. 07.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 468, 471 सह म.जु.का. क. 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : काक्रंबा, ता. तुळजापूर ग्रामस्थ-अंजली उमेश वट्टे, वय 27 वर्षे, यांना दि. 12.11.2022 रोजी 10.10 ते दि. 30.11.2022 रोजी पर्यंत काक्रंबा येथे अज्ञात व्यक्तीने अंजली यांचे मोबाईलमध्ये लिंक पाठवून तुम्हाला ईलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन चा व्यवसाय करायचा असेल तर फिस म्हणुन 25,000 ₹ मागणी केल्याने अंजली यांनी ॲक्सीस बॅक खातेवरून युपीआय द्वारे पेमेंट केली.त्यानंतर सेक्युरिटह डिपॉझिट म्हणून 2,75,000 रु वेगवेगळ्या बॅक खात्यावरुन युपीआयडीद्वारे वाठवले आहेत.  यात अंजली यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या अंजली वट्टे यांनी दि. 07.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.