बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न 

तीन जणांवर  धाराशिवमध्ये गुन्हा दाखल 
 

धाराशिव  : आरोपी नामे-1) संतोष सिध्दलिंग कुंभार, रा.तेरखेडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद, 2) विवेकानंद पांडुरंग आकोस्कर, रा. कोळेवाडी ता. जि. उस्मानाबाद, 3) काशीनाथ हनुमंत भोजणे, रा चिाखली ता. जि. उस्मानाबाद 4) काशीनाथ भिवराज खटके, रा. भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.31.08.2022 रोजी 10.00 ते 13.06.2023 रोजी 17.00 वा. सु. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात कुळ/ इनाम/ सिलींग या कार्यासनाच्या संचिका खोट्या व बनावट कागदपत्रे तयार करुन या बनावट संचिकातील प्रती अभिलेख कक्षामार्फत प्रमाणित करुन दिल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे प्राप्त झाल्या होत्या. 

वर नमुद आरोपी यांनी शासकीय लाभ घेण्यासाठी बनावट संचिकाच्या नकलाचा वापर केला असल्याचा सशंय असल्याने  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी चौकशी समिती गठीत केली होती. दि.21.08.2023 रोजी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्याने वरुन नमुद संशयीत आरोपी यांनी खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी चंद्रकांत विठ्ठल शिंदे, वय 57 वर्षे, नायब तहसीलदार रोजागार हमी योजना तथा अतिरीक्त पदभार सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, रा. शाहुनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद  यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 465, 466, 468, 471  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 मोबाईल रिचार्ज ऑफरचे अमिष दाखवून फसवणूक 
 

उमरगा : आरोपी नामे-1) बबलु बाबुलाल भालके, रा. गोंधळगल्ली, उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.17.04.2023 रोजी 11.00 ते दि2105.2023 रोजी 1.00 वा. सु. एस टी कॉलनी उमरगा येथे फिर्यादी नामे- रविंद्र आण्णाप्पा कारडामे, वय 65 वर्षे, रा. एस टी कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे त्यांचे घरी असताना आरोपीने फिर्यादीस मोबाईल रिचार्ज ऑफरचे अमिष दाखवून त्यांना विश्वासात घेवून त्यांच्या मोबाईलवर अंगठा घेवून मोबाईल वरुन ओ. टी. पी. पाहून त्यांचे महाराष्ट्र बॅकेचे अकाउंट मधील व त्यांची पत्नी व मुलगा यांचे स्टेट बॅक ऑफ इंडिया चे खाते क्रंमाकावरुन एकुण 56,715 ₹ परस्पर काढुन घेवून विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी रविंद्र आण्णाप्पा कारडामे, वय 65 वर्षे, रा. एस टी कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420,406 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.