धाराशिवमध्ये एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक 

 

धाराशिव  : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील- जीवन रावन वाघमारे वय 58 वर्षे हे दि 05.07.2023 रोजी 13.00 ते 13.30 वा. सु. कोर्टाजवळील एसबीआय बॅकेचे एटीएम उस्मानाबाद येथे खात्यावरील रक्कम चेक करीत असताना अनोळखी व्यक्तीने जिवन यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेवून त्यास दुसरे एटीएम कार्ड देवून एटीएमचा पिन नंबर पाहून जिवन यांचे एसबीआय बॅक खात्यातील एकुण 39,400 ₹काढून घेवून जीवन यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या जिवण रावन वाघमारे यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 
 

ज्ञानेश्वर नगर, धाराशिव येथील- पुजा मुकूंद राजेनिंबाळकर, वय 53 वर्षे, या ज्ञानेश्वरनगर उस्मानाबाद येथे दि. 08.07.2023 रोजी 20.30 वा. सु.  घरासमोर असताना दोन अनोळखी इसम लाल रंगाची पल्सर मोटरसायकल वरुन येवून पुजा यांचे गळ्यातील 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे अंदाजे 88,000 ₹ किंमतीचे जबरीने लुटून पसार झाले.अशा मजकुराच्या पुजा राजेनिंबाळकर यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 आदर्श नगर,धाराशिव  येथील- अमोल चांगदेव बाराते, वय 38 वर्षे, यांचे अंदाजे 10,000₹ किंमतीची हिरो होंडा स्कुटी क्र एमएच 25 उस 4221 ही दि. 05.07.2023 रोजी ते दि. 06.07.2023 रोजी 06.30 वा. सु. अमोल यांचे घरासमोरुन अज्ञात व्याक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अमोल बाराते यांनी दि.08.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.