उस्मानाबादेत अवैध मद्य विरोधी कारवाई

 

उस्मानाबाद  : लता दिलीप आगळे, रा. इंदीरानगर, उस्मानाबाद या दि. 05 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीसाठी बाळगलेल्या उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या. तर सुशिल देविदास कांबळे, रा. जेवळी, ता. लोहारा हे याच दिवशी गावातील एका हॉटेलसमोर बियरच्या 18 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.यावरुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.


जुगार विरोधी कारवाई.

बेंबळी  : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन बेंबळी पोलीसांनी दि. 05 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. बरमगाव येथे छापा मारला. यावेळी ग्रामस्थ- तुकाराम कांबळे, बापु कांबळे, लिंबराज सिरसाटे, नंदकुमार नांदे, सुखदेव ढवळे हे पाचजण गावातील एका पत्रा शेडमध्ये तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 2,130 ₹ रोख रक्कम बाळगलेले पथकास आढळले.

कोरोना संसर्ग होण्याची निष्काळजीपनाची कृती करणाऱ्यावर  गुन्हा दाखल

परंडा  : कोविड- 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जारी असलेले मनाई आदेश झुगारुन बार्शी येथील सागर दशरथ रामगुडे हे नाका- तोंडास मास्क न लावता दि. 05 सप्टेंबर रोजी 12.00 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, परंडा येथे फिरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोकॉ- साधु शेवाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम  खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.