अणदूरच्या कार्यकर्त्यांनी फुलवाडी टोलनाका फोडला 

 

नळदुर्ग : अणदूर, ता. तुळजापूर येथील किशोर व्यास, प्रशांत कुलकर्णी, नागनाथ मुडके यांसह 16 व्यक्तीं 4 चारचाकी व 2 मोटारसायकलवर फुलवाडी टोलनाक्याच्या नियंत्रण कक्षात दि. 13.12.2021 रोजी 19.40 वा. सु. गेले. “तुम्ही अणदुरच्या लोकांचा टोल का घेता, टोलनाका आमच्या गाव हद्दीत आहे.” असा जाब विचारुन टोलनाका कर्मचारी- खेमराज तेजलाल सेवईवार यांसह अन्य कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन, मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नियंत्रण कक्षातील संगणक संच, प्रिंटर इत्यादी साहित्याची तोडफोड करुन आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या खेमराज सेवईवार यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : कसबा, भुम येथील जाधव कुटूंबातील नारायण, विकास, कैलास, अभिमान, पोपट, सुदाम यांसह 7 व्यक्तींनी शेतजमीनीच्या मालकी हक्काच्या वादावरुन दि. 15.11.2021 रोजी 17.00 वा. सु. ग्रामस्थ- बाबू रामजी पवार, वय 75 वर्षे यांसह त्यांच्या मुलास त्यांच्या शेतात लाथाबुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ केली. तसेच शेतात पाय ठेवल्यास बाबू यांसह त्यांच्या कुटूंबीयांना ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. यानंतर ते सर्व लोक बाबू पवार यांच्या शेतातील सोया पीक जबरदस्तीने घेउन गेले. अशा मजकुराच्या बाबू पवार यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भूम येथे दिलेल्या फिर्यादीवरुन दि. 15 डिसेंबर रोजी नमूद लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 395, 147, 148, 149, 323, 452, 504, 506 अंतर्गत भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : सारोळा (वा.), ता. वाशी येथील परमेश्वर मनोहर चेडे हे दि. 11.12.2021 रोजी 19.15 वा.सु. आपल्या शेतातील गोठ्यासमोर असतांना त्यांचा मुलगा- सचिन चेडे याने पुर्वीच्या वादातून पिता- परमेश्वर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर चेडे यांनी दि. 15 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.