धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार विरोधी कारवाई 

 

अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि.31.03.2023 रोजी जिल्हाभरात एकुण 6 कारवाया केल्या. यात घटनास्थळावर आढळलेली गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 920 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट नष्ट करण्यात आला तर सुमारे 91 लि. गावठी दारु, देशी- विदेशी दारुच्या एकुण 11 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 58,250 ₹ आहे. यावरुन 06 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 6 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)आनंदनगर पोठाच्या पथकास भिमनगर, शिंगोली येथील- संतोष राजेंद्र सोनटक्के हे 20.00 वा. सु. शिंगोली येथे एकुण 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

2) भुम पोठाच्या पथकास गोरमाळा, ता. भुम येथील- सोमनाथ काळे हे 17.45 वा. सु. गोरमाळा फाट्यावर एकुण 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर पाटसांगवी, ता. भुम येथील- हनुमंत रणखांबे हे 15.05 वा. सु. पाथरुड जाणारे रोडलगत पाठसांगवी येथे 11 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले  आढळले.

3)ढोकी पोठाच्या पथकास कोंड, ता. धाराशिव येथील- सखाराम बाबुराव जाधव हे 20.00 वा. सु. गावातील आपल्या घरा शेजारी एकुण 21 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

4)तामलवाडी पोठाच्या पथकास खडकी तांडा, ता. तुळजापूर येथील- विजय राठोड हे 07.00 वा. सु. ख्डकी तांडा शिवार आपल्या शेतामध्ये एकुण 20 लि. गावठी दारु व 800 गावठी दारु करण्यासाठी गुळ मिश्रीत रसायन अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

5)येरमाळा पोठाच्या पथकास खडकी तांडा, ता. तुळजापूर येथील- विजय राठोड हे 07.00 वा. सु. ख्डकी तांडा शिवार आपल्या शेतामध्ये एकुण 18 लि. गावठी दारु 120 गावठी दारु करण्यासाठी गुळ मिश्रीत रसायन अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

  जुगार विरोधी कारवाई\

येरमाळा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.31.03.2023 रोजी 13.45 वा. सु.येरमाळा पो.ठा.हद्दीत छापा टाकला. यावेळी भिमनगर, येरमाळा येथील- सुबोध ओव्हाळ बार्शी ते येरमाळा जाणारे रोडलगत भिमनगर येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 770 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

अंबी  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान अंबी पोलीसांनी दि.31.03.2023 रोजी 13.45 वा. सु.अंबी पो.ठा.हद्दीत छापा टाकला. यावेळी कुक्कडगाव, ता. परंडा येथील- नवनाथ वायसे, संतोष बिबे, संदीप नरके, समाधान राऊत, प्रभु लांडगे, विकास निरवणे, पांडूरंग खरात, या सर्वांनी कुक्कडगाव येथील शाळेच्या पाठीमागे चिंचेच्या झाडाखाली तिरट जुगार चालवण्याच्या साहित्यासह 890 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

नळदुर्ग  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.31.03.2023 रोजी 19.35 वा. सु.नळदुर्ग पो.ठा.हद्दीत छापा टाकला. यावेळी अणदुर, ता. तुळजापूर येथील- विलास गाढवे हे चिवरी पाटी अणदुर येथे मेन बाजार मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 930 ₹ रक्कम बाळगलेले आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत सबंधीत पो.ठा. येथे स्वंतत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.