उस्मानाबादेत चोरीच्या दोन स्मार्टफोनसह आरोपी ताब्यात

 

उस्मानाबाद  : स्मार्टफोन चोरीस गेल्यावरुन आनंदनगर पो. ठा. येथे गु.र.क्र. 174 / 2021 हा  भा.दं.सं. कलम- 379 नुसार आणि कळंब पो.ठा. येथे गु.र.क्र. 228 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलीस ठाणे, उस्मानाबाद यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे तांत्रीक विश्लेषन करण्यात आले.  यातून स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, शेळके, पोकॉ- सर्जे यांच्या पथकाने भुम येथील एका अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्थ) मुलास नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरीच्या दोन स्मार्टफोनसह काल दि. 05 सप्टेंबर रोजी ताब्यात घेउन आनंदनगर पो. ठा. च्या ताब्यात दिले आहे.


चोरीच्या दोन घटना 

उस्मानाबाद  : बेबी महंमद कुरेशी, रा. तेरणा फिल्टर टाकी समोर, उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या चार शेळ्या दि. 04.09.2021 रोजी 10.00 ते 11.00 वा. दरम्यान अशिष अशोक साबळे, रा. एकुर्गा, ता. लातुर यांनी चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या बेबी कुरेशी यांनी दि. 05 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत समतानगर, उस्मानाबाद येथील भारत संदीपान कांबळे हे कुटूंबीयांसह दि. 04 सप्टेंबर रोजी 14.00 ते 15.00 वा. दरम्यान घरास कुलूप न लावता बाहेर गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातील 8 ग्रॅम सुवर्ण दागिने, दोन भ्रमणध्वनी व 15,000 ₹ रोख रक्कम अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या भारत कांबळे यांनी दि. 05 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : नितीन आप्पाराव बनसोडे, रा. उस्मानाबाद यांनी शहरातील फुलचंद मंगलकार्यालय समोरील त्यांच्या मोकळ्या जागेत ठेवलेली 8 एमएम सळई 51 नग, 14 फुट ॲल्युमिनीयम सिडी व एक पाण्याची टाकी दि. 02- 03 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नितीन बनसोडे यांनी दि. 05 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.