चिखली चौरस्त्यावर पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटक
धाराशिव - धाराशिव तालुक्यातील चिखली चौरस्त्यावर पिस्तुल व जिवंत काडतुसासह उभ्या असलेल्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये श्स्त्र अधिनियम कादान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आज दि.16.04.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चिखली चौरस्त्यावर लाल चौखडा रंगाचा शर्ट व आकाशी निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परीधान केलेला इसमाचे कमरेला बंदुक सारखे काहीतरी शस्त्र हाती घेतले आहे.
यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावून मिळालेल्या बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून दुपारी 02.15 वा नमुद वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवून त्याचे नवा गाव विचारले असता त्याने त्याचे नाव किशोर लिंबराज माळी , वय 34 वर्षे, रा. चिलवडी, ता धाराशिव असे सांगितले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात 15,500 ₹ किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टन व एक जिवंत काडतुस मिळून आले.
यावर पथकाने त्यास अटक करुन त्याच्या ताब्यातील देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त करुन त्याचेविरुध्द पोलीस ठाणे बेंबळी या ठिकाणी श्स्त्र अधिनियम कादान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकव अप्पर पोलीस अधीक्षक वनीत कॉवत यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार विनोद जानराव, फराहान पठाण या पथकाने केली.