कळंब ते येरमाळा रोडवर अपघात ; दोन ठार 

 

कळंब  : कामठा बु, ता. अर्धापुर येथील-माधव पुर्बा दासे, सोबत कापशी, ता. लोहा येथील- शिनु उत्तम दासे वय 16 वर्षे, हे दोघे दि.26.06.2023 रोजी 00.30 ते 01.00 वा. सु. कळंब ते येरमाळा रोडवर हॉटेल येडेश्वरी आंदोरा शिवार येथुन मोटरसायकल क्र एमएच 26 एजी 1907 वरुन जात होते. दरम्यान किया कार क्र एमएच 25 एएस 9291 च्या चालकाने त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून माधव यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात माधव व शिनु हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या साहेबराव बालाजी छापेवार यांनी दि.26.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 18, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

उमरगा : गुंजोटी, ता. उमरगा येथील-विजय महादेव माने यांनी दि. 25.06.2023 रोजी  19.30 वा.सु. उमारगा येथील एन.एच.65 आरोग्य कॉर्नर समोरील रस्त्यावर आपल्या ताब्यातील ॲटो रीक्षा क्र.एम.एच. 08 एएल 9106 हा रहदारीस धोकादायकरीत्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमारगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 शिराढोण : खामसवाडी, ता. कळंब ग्रामस्थ- सत्तार अब्दुलगणी शेख यांनी दि.26.06.2023 रोजी 13.00 वा. सु. जि.प.प्रा. शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी खामसवाडी येथे रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

तामलवाडी  : तामलवाडी, ता. तुळजापूर येथील- दगडु भाकरे, दशरथ भाकरे, सागर भाकरे या तिघांनी दि.25.06.2023 रोजी 10.30 वा.सु. शेड मारण्याच्या कारणावरुन गावकरी- तुकाराम गेनबा भाकरे  यांना दगडु व दशरथ यांनी शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, मारहाण करुन  कुह्राडीने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या तुकाराम भाकरे यांनी दि.26.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 326, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मालमत्तेविरुध्द गुन्हे

उमरगा  : एस टी कॉलनी, उमरगा येथील- शेषेराव हारीबा भोसले, वय 56 वर्षे, यांचे घराचे दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.23.06.2023 रोजी 12.00 ते 20.00 वा. सुमारास तोडून आत प्रवेश करुन 40 वजनाचे सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 60,000 ₹ असा एकुण 2, 60, 000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या शेषेराव भोसले यांनी दि.26.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.