शेतवस्तीवर मारहाण करुन लूटमार करणारी टोळी जेरबंद 

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश 
 

धाराशिव - शेतवस्तीवर मारहाण करुन सोने - चांदीचे दागिने आणि अन्य  ऐवज लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसाना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसानी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयक गुन्हे उघडकीस आणनेकामी दि. 25.06.2023 रोजी  उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान सरमकुंडी येथे गेले असता गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीवरुन नमुद संशईत आरोपी याचे तांत्रिक विषलेशनावरुन तो अहमदनगर जवळ असल्याची पथकास समजले. 

 पथकाने सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता  दोन संशईत इसम मिळून आल्याने. त्यांस पथकाने त्यांचे नाव गाव व मालाविषयक दाखल गुन्ह्या बाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांने त्याचे नाव- अनुज उर्फ भैय्या नागेश भोसले, वय 25 रा. डोकेवाडी, ता. भुम असे सागिंतले. व त्याचे इतर तीन साथीदार यांनी  मिळून  पो स्टे परंडा, बेंबळी  हद्दीत गुन्हे केल्याचे पथकास सागिंतले. 

यावरुन पथकाने नमूद पोलीस ठाणे येथे गुन्ह्या विषयी चौकशी केली असता पोलीस ठाणे परंडा गुरनं 111/2023 भा.द.सं. कलम 394, 34, गुरनं 159/2023 भा.द.सं. कलम 394, 34, गुरनं 67/2023 भा.द.सं. कलम 454,380 व पोलीस ठाणे बेंबळी गुरनं 115/2023 भादवि कलम 394,457, 380, 34, पाहीजे आरोपी पोलीस स्टेशन सोलापूर ता. गुरनं 157/2022 भा.द.सं. 396, 397  येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे अमोल बापू काळे, रा. पांढरेवाडी ता. परंडा  व त्यांचा एक साथीदार यांनी  पो. स्टे अंबी हद्दीतील मंदीरातील दानपेटी तोडून चोरी केल्याचे पथकास सागिंतले. पोलीस ठाणे अंबी गुरंन 09/2023 भा.द.सं. कलम 457, 380, 34 अंतर्गत गुन्हा दाख आहे.  गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्हे उघडकीस आणुन दोन आरोपीनां ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाईस्तव  पोलीस ठाणे परंडा, अंबी व बेंबळी यांचे  ताब्यात दिले आहे. व पुढील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, पोउपनि संदीप ओहळ, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हावलदार- शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, मपोहेकॉ शैला टेळे, पोलीस नाईक नितीन जाधवर, पांडूरंग सावंत, पोलीस अंमलदार साईनाथ्‍ अशमोड, योगेश कोळी, चालक पोअं- कुंभार, कोलते पोलीस अंमलदार- कदम (TAW) यांच्या पथकाने केली आहे.