वाघोलीत  ट्रॅक्टरने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

 

येरमाळा  : वाघोली, ता. कळंब येथील- रंगनाथ विठ्ठल कदम, वय 45 वर्षे, हे  दि.24.05.2023 रोजी 21.00 वा. सु. येडशी ते वाघोली  शिवारातील शेताकडे जात होते. ट्रॅक्टर  क्र एमएच 25 ए डब्ल्यु 7785 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगात हायगई व निष्काळजीपने चालवुन रंगनाथ यांना पाठीमागून धडक दिली. 

या अपघातात रंगनाथ हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टर चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा पुतण्या- बाळासाहेब विनायक कदम यांनी दि.31.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 134 अ ब , अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

कळंब  : कल्पना नगर, कळंब ग्रामस्थ- धनंजय पांडुर्रग कोळपे हे दि.30.05.2023 रोजी 23.35  वा. सु. आपल्या ताब्यातील  मोटरसायकल  क्रं एमएच 25 ए. ए 9914  ही सनराईज बार समोर येरमाळा रोड कळंब येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे. 

 गांजा या अमली पदार्थ भरुन सेवण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

ढोकी : ढोकी, ता. उस्मानाबाद येथील- नामदेव सोनपारखे, अनंत तिवारी हे दोघे दि. 31.05.2023 रोजी 20.15 वा. सु. ढोकी गोडाउन समोरील बाजूस पत्रयाचे शेडमध्ये येथे मातीची चिलीम पेटवून त्यामध्ये गांजा सद्रस्य पदार्थ हिरवट पाला एक पॉकेट पांढऱ्या रंगाचा कापड 4 काडीपीटी असे सेवन करताना ढोकी पोठा च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी  मातीची चिलीम व हिरवट पाला जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द एन. डी. पी. एस.  कायदा कलम- 8 (क), 27 अंर्तगत  ढोकी पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.