मंडळ अधिकारी तुळशिराम मटके याना शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
कळंब : मंडळ अधिकारी- तुळशिराम दत्तात्रय मटके हे दि. 06.12.2021 रोजी 12.00 ते 13.00 वा. सु. तलाठी कार्यालय, कळंब येथे कर्तव्यावर असतांना कळंब येथील मकसुद महेमुद सौदागर व अजहर मकसुद सौदागर यांनी तेथे जाउन मटके यांच्या अंगावर धाउन जाउन शिवीगाळ करुन धमकावले. तसेच मटके यांच्याकडे 25,000 ₹ रकमेची मागणी केली. यावरुन तुळशिराम मटके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 385, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद: उस्मानाबाद ते पुणे जाणारी एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 3525 ही दि. 07.12.2021 रोी 11.15 वा. सु. उस्मानाबाद बस आगारातून प्रवासी घेउन गैरमाळ तांड्यावरील रस्त्याने जात असतांना एका काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी बस मधील लोकांचे जिवीत धोक्यात येईल अशा पध्दतीने बसवर दगड फेकून मारले. यात बसची समोरी काच फुटून अंदाजे 15,000 ₹ आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या एसटी बस चालक- हरिदास पंढरी फडके यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक संपत्तीस हाणी प्रतिबंधक अधिनियम कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धार्मीक भावना दुखावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक येडशी बस स्थानकालगत लावलेला होता. त्या फलकावर अनेक व्यक्तींचे तसेच एका राष्ट्रीय नेत्याचे छायाचित्र होते. तो फलक दि. 05- 06.12.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने फाडल्याने धार्मीक भावना दुखावल्या गेल्या. अशा मजकुराच्या संबंधीत व्यक्तीने दि. 07 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 295, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.