कळंबमध्ये सार्वजनिक ठिकाणी हाणामाऱ्या करणाऱ्या तीन तळीरामाविरुद्ध गुन्हा दाखल

 

कळंब  : कळंब येथील 1) प्रभाकर किसनलाल ओझा 2) फिरोज पाशा बागवान 3) दत्ता स्वामीसिंग परदेशी हे तीघे दि. 14.01.2022 रोजी 02.15 वा. सु. कळंब शहरातील एका पेट्रोल पंपासमोर मद्यधुंद अवस्थेत आपापसात हानामाऱ्या करुन सार्वजनिक शांतता भंग करत असतांना कळंब पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 160 सह महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण 

परंडा  : कौडगाव, ता. परंडा येथील कालीदास नारायण पांढरे यांनी आपल्या शेतातील पाईपलाईनचे नुकसान केल्याचा जाब ग्रामस्थ-  चोपडे कुटूंबातील अर्जुन, सुग्रीव, मारुती, संचज, रंजीत, सोमनाथ, सविता, इजुबाई, महादेवी यांसह आवाटी  ग्रामस्थ- दिनकर खताळ यांना दि. 04.01.2022 रोजी 18.30 वा. सु. कौडगाव येथील बाळुमामा मंदीरासमोर विचारला. यावर नमूद लोकांनी चिडून जाउन कालीदास पांढरे यांसह त्यांची पत्नी- मैनाबाई, मुले- प्रविण व अशोक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, कत्ती, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कालीदास पांढरे यांनी दि. 14 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : तुळजापूर ग्रामस्थ- संग्राम पलंगे, कृष्णा पलंगे, संभाजी पलंगे, सचिन पलंगे, अमर परमार यांनी जुन्या वादावरुन गावकरी-  नितीन राम नन्नवरे, वय 22 वर्षे यांना दि. 13.01.2022 रोजी 21.25 वा. सु. ऑटोरिक्षामध्ये बळजबरीने बसवून अपसिंगा शिवारात नेले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज, दगड, काठीने नितीन नन्नवरे यांच्या हाता-पायावर, छातीवर, डोक्यात मारहान करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन नन्नवरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 364, 307 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.