परंडा पोलिसांची बदनामी केली म्हणून दोघांवर गुन्हा दाखल

 

परंडा  : 'चक्क दारुची बाटली घेऊन  पोलीस चौकीमध्ये' असे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करून परंडा पोलिसांची बदनामी केली म्हणून दोघांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. 


पोलीसांची जनमाणसात बदनामी व्हावी, जनतेत पोलीसांविषयी द्वेष पसरावा या उद्देशाने परंडा पोलीस ठाण्याच्या जवळा (नि.) दुरक्षेत्र येथील कार्यालयाच्या बंद दरवाजा समोर ग्रामस्थ- प्रमोद कातुरे हा हातात दारुची बाटली घेउन बसलेला असल्याचे छायाचित्र ग्रामस्थ-हेमंत कारकर याने कॅमेऱ्याने काढून व त्या छायाचित्राखाली, “चक्क दारुची बाटली घेउन पोलीस चौकीमध्ये.” असा मजकूर लिहून ते छायाचित्र कारकर याने दि. 01.11.2021 रोजी व्हॉट्सॲपद्वारे प्रसारीत केले.

यावरुन परंडा पो.ठा. चे पोलीस अंमलदार- सुधीर माळी यांनी दि. 04.11.2021 रोजी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.वि. -कलम 34 व पोलीस अप्रीतीची भावना चेतवने कायदा -कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

भूम  : वाल्हा, ता. भुम येथील निगड्या मारुती जाधव हे दि. 04.11.2021 रोजी 12.15 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 11 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना भुम पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.