दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

धाराशिव लाइव्हचा दणका 
 

धाराशिव – तालुक्यातील दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने यांना उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी सेवामुक्त करून खोटे शपथपत्र दिले म्हणून पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी  खोटी साक्ष दिली म्हणून मदने यांच्यानंतर दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून धाराशिव लाइव्हने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. 

दाऊतपूरचे सेवामुक्त पोलीस पाटील संतोष मदने यांच्यावर गुन्हा दाखल, दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावरही टांगती तलवार
पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना इतर ठिकाणी नोकरी करता येत नाही, असा नियम असताना दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने हे अदानी कॅपिटल प्रा. लि. या कंपनीत सोलापुरात वसुली प्रतिनिधी म्हणून काम करत होते. मात्र ते मी कुठेही नोकरी करीत नाही, असे खोटे शपथपत्र सन २०१८ मध्ये नियुक्तीवेळी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दिले होते.

याप्रकरणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी उप विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची सुनावणी उपविभागीय दंडाधिकारी , उस्मानाबाद यांच्याकडे झाली असता, दाऊतपूरचे सरपंच, उपसरपंच, एक सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष यांनी खोटा जबाब दिला.

याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी योगेश खरमाटे यांनी दाऊतपूरचे पोलीस पाटील संतोष पांडुरंग मदने यांना सेवामुक्त करून खोटे शपथपत्र दिले म्हणून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा मार्च महिन्यात गुन्हा दाखल  करण्यात आला होता,  याप्रकरणी खोटा जबाब दिला म्हणून  सरपंच  बंकट शिंदे , उपसरपंच कानिफनाथ भांगे, , ग्रामंपचायत सदस्य विशाल थोरात , तंटामुक्ती अध्यक्ष  राजाभाऊ शिंदे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून धाराशिव लाइव्हने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. 

हे आहेत कलमे

भादंवि ४२०, १९९, २००