उस्मानाबादेत धार्मीक भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळी रस्त्यालगतचे एका संताचे चित्र असलेला फलक दि. 12.11.2021 रोजी 08.00 वा. सु. अज्ञाताने धार्मीक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक फाडला आहे. अशा मजकुराच्या रविंद्र कोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 295 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोका उत्पन्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

मुरुम : जगदिशसिंग गहिरवार, रा. नळदुर्ग व निळकंठ माशाळकर, रा. येळी या दोघांनी दि. 12.11.2021 रोजी 12.30 वा. सु. मुरुम मोड येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा रहदारीस धोकादायकरीत्या उभा केला तर मुरुम ग्रामस्थ- सुरज वाघ व नवनाथ रोडगे यांनी 19.30 वा. सु. छ. शिवाजी महाराज चौक, मुरुम येथील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील पिकअप वाहन रहदारीस धोकादायकरीत्या उभा केला असल्याचे मुरुम पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत 4 गुन्हे नोंदवले आहेत.

निर्दयपने गोवंश वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

तामलवाडी : दि. 12.11.2021 रोजी 14.00 वा. सु. माळुंब्रा शिवारात अशोक लेलॅण्ड वाहन क्र. एम.एच. 25 पी 5572 मधून एक गाय चारापाण्याची, औषधोपचाराची, वायुविजनाची सोय न करता निर्दयपने वाहुन नेल्याने ती गाय मयत झाली. अशा मजकुराच्या सांगवी (मार्डी), ता. तुळजापूर ग्रामस्थ- अनील पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद वाहनाच्या अज्ञात चालकाविरुध्द प्राण्यांचे परिवहन नियम- 47, 54, 56 सह प्राण्यांचा छळास प्रतिबंध अधिनियम कलम- 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.