उस्मानाबादेत तोतया सीबीआय अधिकाऱ्याकडून महिलेची फसवणूक 

 

उस्मानाबाद -  बालाजी नगर, उस्मानाबाद येथील श्रीमती शैलेजा विठ्ठलराव कुलकर्णी, वय 71 वर्षे या दि. 23 मे रोजी 10.30 वा. सु. बालाजी नगर येथील शेकापूर रस्त्याने ऑटो रीक्षाने प्रवास करत होत्या. यावेळी तीन अनोळखी पुरुषांनी शैलेजा प्रवास करत असलेला रीक्षा अडवून सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन त्या तीघांतील एकाने रीक्षा चालकास बाजूला घेउन वाहतूक परवाणाविषयी चौकशीत गुंतवले. तर अन्य दोघांनी शैलेजा यांना, “ तुम्ही येवढे सोने अंगावर घालून फिरु नका, सोने चोरी करणारी टोळी शहरात फिरत आहे. तुमच्या अंगावरील दागिने आमच्याकडे द्या ते तपासून आम्ही पिशवीत ठेवतोत.” अशी थाप मारली. यावर शैलेजा यांनी काही एक विचार न करता 15 ग्रॅमचे गंठण व 50 ग्रॅमच्या पाटल्या असे 65 ग्रॅम सुवर्ण दागिने त्या दोन भामट्यांच्या हस्ते पिशवीत ठेवण्यासाठी त्यांच्या हातात दिले. घरी गेल्यानंतर आपल्या पिशवीत ते दागिने नसून बनावट दागिने व दगडाचे तुकटे असल्याचे शैलेजा यांच्या निदर्शनास आले. अशा मजकुराच्या शैलेजा कुलकर्णी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीचे चार गुन्हे दाखल 

ढोकी  : तावरजखेडा, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- तुकाराम अर्जुन फेरे यांसह अन्य चार गावकऱ्यांच्या निवळी गावच्या तलावातील 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे- 2, 5 अश्वशक्ती क्षमतेचे- 3 पानबुडी विद्युत पंप असे एकुण 5 विद्युत पंप दि. 22- 23 मे रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या तुकाराम फेरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी  : मसला (खुर्द), ता. तुळजापूर येथील महादेव अंबादास अभंगराव हे कुटूंबीयांसह दि. 22- 23 मे रोजीच्या रात्री घर कुलूप बंद करून छतावर झोपले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील कपाटातील सुवर्ण दागिने व रक्कम असा एकुण 1,42,500 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या महादेव अभंगराव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तुळजापूर  : शिराढोन, ता. तुळजापूर येथील सचिन शिवाजी पवार यांच्या घराचा कडी- कोयंडा तीन अनोळखी पुरुषांनी दि. 23 मे रोजी 01.00 वा. सु. कट करुन घरातील सुवर्ण दागिने व रोख रक्कम असा एकुण 1,15,000 ₹ माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सचिन पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : शिवपूरी रोड, उमरगा येथील श्रीकृष्ण राम ब्याळे यांची होंडा सीबी शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएक्स 1597 ही दि. 19 मे रोजी 23.00 वा. सु. त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या ब्याळे यांनी दि. 23 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.