येरमाळ्यात दोन ठिकाणी तुंबळ हाणामारी 

 

येरमाळा  : अवधूतवाडी, ता. कळंब येथील समाधान गुरुराज अवधुत हे दि. 04.04.2022 रोजी 14.00 वा. पत्नी- स्वाती, वय 28 वर्षे सोबत आपल्या शेतात खुरपणी करत होते. यावेळी मद्यधुंद असलेल्या समाधान यांनी कौटुंबीक वादाच्या कारणावरुन पत्नी- स्वातीच्या डोक्यात कोयता मारुन मानेवर कोयता मारण्याचा प्रयत्न केला असता स्वाती यांनी हाताने तो वार अडवल्याने त्यांच्या डोक्यास,  हातास गंभीर जखम झाली. बचाव करण्याच्या प्रयत्नात स्वाती या जमीनीवर पडल्या असता समाधान याने शेतातील प्लास्टीकच्या बाटलीतील पेट्रोल स्वाती यांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवताच स्वाती यांनी बचाव करण्याच्या प्रयत्नात पती- समाधान यास मिठी मारल्याने ते दोघेही भाजून जखमी झाले. अशा मजकुराच्या स्वाती यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरून भा.दं.सं. कलम- 307, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
येरमाळा  : पानगांव, ता. कळंब येथील आंतीका बबन ओव्ळ यांसह 5 कुटूंबीयांचा गावकरी- सुधामती बाबासाहेब ओव्हळ यांसह 8 कुटूंबीयांशी जुण्या भांडणाच्या व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 4 व 5 मे रोजी हाणामाऱ्या झाल्या. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आंतीका ओव्हाळ व सुधामती ओव्हळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

वाशी : वाशी येथील रामा तायप्पा चव्हाण व त्यांची दोन मुले- आकाश, माउली हे दि. 10 मे रोजी 18.00 वा. सु. पारा चौक, वाशी येथील रस्त्याने जात होते. यावेळी गावकरी- राजु कवडे, योगेश कवडे, विनोद कवडे, शैलेश चौधरी यांसह अन्य तीन पुरुष यांनी पुर्वीच्या वादावरुन नमूद चव्हाण पिता- पुत्रांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. या मारहानीत रामा चव्हाण यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले तर माउली यांच्या डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या रामा चव्हाण यांनी दि. 11 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.