वाशी : कौटुंबिक वादाच्या कारणावरून पत्नींचा खून 

 

वाशी  : बिच्चाची पारधी पिढी, ईटकुर येथील बापु मच्छिंद्र काळे यांनी कौंटुबीक वादाच्या कारणावरून दि. 6- 7.05.2022 रोजी दरम्यान पारा गायरान शिवारात त्यांची पत्नी- लालुबाई बापु काळे, वय 28 वर्षे यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांचा खून केला आहे. अशा मजकुराच्या सखुबाई सुब्राव शिंदे, रा. चिरकाळ पारधी पिढी, पारा यांनी दि. 8 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तीन ठिकाणी हाणामारी 

ढोकी  : पिंपळा (खु.), ता. तुळजापूर येथील नितीन अर्जुन हजारे, वय 33 वर्षे हे दि. 07 मे रोजी 16.30 वा. सु. पिंपळा गट क्र. 201 मधील शेतात होते. यावेळी शेजारील शेतात ट्रॅक्टरने मशागत करणारे गावकरी- हणमंत बाळु दनके यांनी ट्रॅक्टरने बांधावरील झाडांचे नुकसान केल्याने नितीन यांनी त्यांना हटकले. यावर नितीन व हणमंत दनके यांच्यात वाद होउन हणमंत यांसह बाळु दनके यांसह त्यांच्या नातुने नितीन यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने हणमंत यांनी नितीन यांच्या पोटावरुन ट्रॅक्टर घालून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी नितीन यांच्या बचावास आलेला त्यांचा भाऊ- गणेश यांसही नमूद लोकांनी मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नितीन हजारे यांनी दि. 08 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : सरमकुंडी, ता. वाशी येथील ज्ञानेश्वर भिवराव गायकवाड यांनी दि. 08 मे रोजी 08.30 वा. सु. भाऊबंद- भाऊसाहेब भागवत गायकवाड यांसह त्यांचा भाऊ- सचिन व चुलता- चुलती यांना त्यांच्या घरासमोर पुर्वीच्या वादावरून शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने मारहान करुन जखमी केले. या मारहानीत चुलते- भानुदास देवराव गायकवाड यांचा उजव्या हाताचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या भाउसाहेब गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सचिन साळुंके, रा. घाटशिळ रोड, तुळजापूर यांनी दि. 07 मे रोजी 06.45 वा. सु. तुळजाभवानी मंदीरातील कर्मचारी- प्रदिप बळीराम चौधरी यांना मंदीराच्या गाभाऱ्यातील कचऱ्याची बकेट न उचलल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रदिप चौधरी यांनी दि. 8 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.