उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

तुळजापूर  : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील विजय पंडीत डोंगरे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 4153 तसेच प्रसाद कमलाकर पाटील व रमेश नागनाथ डोंगरे यांच्या अनुक्रमे स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 9136 , होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 1932 अशा तीन मोटारसायकल दि. 03- 04.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या विजय डोंगरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापूर  : हडको, तुळजापूर येथील नरेश बाबुराव पेंदे यांच्या बोरी गट क्र. 13 मधील कुकूटपालन शेडची जाळी दि. 03- 04.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कापून शेडमधील एकुण 400 कोंबड्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या नरेश पेंदे यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

ढोकी  : किणी, ता. उस्मानाबाद येथील जिवन आरदुले हे दि. 04.03.2022 रोजी 18.45 वा. सु. गाव शिवारात 180 मि.ली. क्षमतेच्या देशी- विदेशी दारुच्या 13 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.