उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण 

 

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील एक 14 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 09.02.2022 रोजी दुपारी 03.00 ते 05.00 वा. दरम्यान कुटूंबीयांसह नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास गेली होती. विवाह सोहळयात तसेच समाप्तीनंतरही ती कुटूंबीयांसह न आढळल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले असावे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीये) दि. 10.02.2022 रोजी 12.30 वा. सु. गावातील बस स्थानक येथे असतांना ओळखीच्या एका तरुणाने तेथे जाउन, “तु माझ्या सोबत लग्न करण्यासाठी पळुन नाही आलीस तर तुला व तुझ्या आई-वडीलांस ठार मारीन.” असे तीला धमकावून बळजबरीने फुस लावून तीचे अपहरन केले. यानंतर तीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करवून घेउन दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366, 323, 506 सह पोक्सो कायदा कलम- 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.