उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार, तीन जखमी 

 

वाशी  : मोरगाव, ता. बीड येथील- दिलीप दादाराव कागदे, वय 59 वर्षे हे दि. 02.10.2022 रोजी 13.30 वा. सु. पारगाव शिवारातील रस्त्याने तुळजापूरकडे पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत दिलीप कागदे हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या प्रशांत भरत कागदे, रा. मोरगाव, ता. बीड यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : सारोळा, ता. लातूर येथील- योगेश संतोष बेल्लाळे, वय 17 वर्षे याच्या सोबत त्याची आई- सुवर्णा व बहिण- वैष्णवी असे तीघे दि. 01.10.2022 रोजी 16.00 वा. सु. तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 हा मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीके 2393 ने ओलांडत होते. यावेळी अज्ञात चालकाने एसटी बस क्र. एम.एच. 14 बीटी 3430 ही निष्काळजीपने चालवल्याने नमूद तीघे प्रवास करत असलेल्या मो.सा. ला धडकली. या अपघातात योगेश बेल्लाळे हा मयत होउन सुवर्णा व वैष्णवी या दोघी गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या सुवर्णा संतोष बेल्लाळे यांनी दि. 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बावी येथे हाणामारी 

 भुम  : बावी, ता. भुम येथील- रामा कांबळे, प्रल्हाद कांबळे, बिभीषण कांबळे, नितीन कांबळे, केराबाई कांबळे, अर्चना कांबळे, शितल कांबळे, रोहिणी कांबळे, अलका कांबळे, बिभीषण कांबळे यांचा जावई या सर्वांनी शेतजमीनीच्या जुन्या वादावरुन दि. 17.10.2022 रोजी 10.00 वा. सु. बावी शिवारात गावकरी- शोभा भिमराव कांबळे, वय 60 वर्षे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन शोभा यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सुवर्णा भिमराव कांबळे, रा. बावी, ता. भुम यांनी 18.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 143, 145, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.