उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 
 

 

उस्मानाबाद  : कुमाळवाडी, ता. उस्मानाबाद येथील- अजित साहेबराव चव्हाण, वय 22 वर्षे हे दि. 09.09.2022 रोजी 21.00 वा. सु. उपळा फाटा येथील रस्त्याने विना नोंदणी क्रमांकाची मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने अज्ञात वाहन निष्काळजीपने चालवल्याने अजित चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडकले. या अपघातात अजित चव्हाण हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे आजोबा- जंगल तानाजी चव्हाण, रा. कुमाळवाडी यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : रांजणी, ता. कळंब येथील- अनिकेत सचिन शिंदे, वय 20 वर्षे हे दि. 19.11.2022 रोजी 19.00 वा. सु. शिराढोन येथील लातुर ते कळंब रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एए 7827 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 0679 ही निष्काळजीपने चालवल्याने अनिकेत हे चालवत असलेल्या नमूद मो.सा. समारुन धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची आई- संगीता सचिन शिंदे यांनी दि. 25.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा नोंद

 ढोकी  : राजेशनगर, ढोकी येथील- सरवर मुलानी हे दि. 25.11.2022 रोजी 22.1000 वा. सु. ढोकी पेट्रोल पंप चौकातील रस्त्यावर आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र. एम.एच. 25 -6435 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मो.वा.का. कलम- 185 अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.