उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 

उस्मानाबाद : चालक- जरबंद रघुनाथ खैरे, रा. जुनोनी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 05.02.2022 रोजी 13.15 वा. सु. अंबेहोळ गावातील रस्त्यावर ॲपे‍ रिक्षा क्र. एम.एच. 25 एन 1177 हा निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याबाजूस खेळत असलेल्या मदीना समीर शेख या 9 वर्षीय मुलीस समोरुन धडकला. या अपघातात मदीना ही गंभीर जखमी होउन मयत झाली. अशा मजकुराच्या हज्जुबा बशीर शेख, रा. अंबेहोळ यांनी दि. 09 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम : जाब, ता. भुम येथील चंद्रकांत प्रल्हाद भोरे, वय 65 वर्षे हे दि. 05.02.2022 रोजी 01.00 ते 03.00 वा. दरम्यान आपल्या शेतातील ज्वारी पिकास पाणी देत होते. यावेळी विद्युत खांबावरील विद्युत वाहिनीची तार तुटून त्या पिकात पडल्याने त्या विद्युत वाहिनीच्या विद्युत धक्क्याने चंद्रकांत हे मयत झाले. सदर प्रकरणी चंद्रकांत यांचा मुलगा- उमेश भोरे यांनी शेाततील त्या विद्युत वाहिन्यांस झोळ पडल्याचे जांब गावचे वायरमन अशोक होगांडे यांना वेळोवेळी सांगुनही त्यांनी त्या तारा तानल्या नसल्याने वायरमन यांनी केलेल्या दर्लक्षीतपणामुळे चंद्रकांत भोरे हे मयत झाले. अशा मजकुराच्या उमेश भोरे यांनी दि. 09 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नुकसान

भूम : सामनगाव, ता. भुम येथील दादासाहेब बाळु पाटोळे यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 12 केडी 0540 वर दि. 08- 09.02.2022 रोजी घरासमोर लावलेली असतांना 20.30 ते 01.30 वा. दरम्यान गावकरी- रोहन  पाटोळे यांनी नुकसान करण्याच्या उद्देशाने त्या मोटारसायकलवर शाल टाकून पेटवल्याने शालीसोबत मोटारसायकल जळून आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या दादासाहेब पाटोळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.