उस्मानाबाद जिल्ह्यात अपघातात दोन जखमी 

 

मुरुम   : चालक- सतीश गुणवंत लोणे (पत्ता उपलब्ध्द नाही) यांनी दि. 08.10.2022 रोजी 11.30 वा. सु. दस्तापुर गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील वळणावर क्रुझर वाहन क्र. एम.एच. 25 एएफ 3351 हे भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने ते अनियंत्रीत होउन रस्त्याबाजूच्या खड्ड्यात जाउन पलटले. या अपघातात वाहनातील प्रवासी- मंजीरी धनंजय मोरे, वय 45 वर्षे, रा. लातूर यांचा उजवा हात तुटून त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या मंजीरी मोरे यांनी दि. 12.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : अज्ञात चालकाने दि. 06.10.2022 रोजी 08.00 वा. सु. सरमकुंडी फाटा येथील दशरथ गायकवाड यांच्या पानटपरीसमोरील रस्त्यावर अशोक लेलॅन्ड वाहन क्र. एम.एच. 25 पी 3538 हे निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणारे विनोद भाऊसाहेब कदम, वय 25 वर्षे, रा. सरमकुंडी यांना पाठीमागून धडकल्याने विनोद हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सरमकुंडी ग्रामस्थ- धिरज शंकरराव गपाट यांनी दि. 12.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मंगरुळ,येथे हाणामारी 

 तुळजापूर  : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील- अशोक गुलाब जेटीथोरे, वय 45 वर्षे हे दि. 12.10.2022 रोजी 15.30 वा. सु. गावातील मुलतान गल्ली येथील मठात बसलेले होते. यावेळी गावकरी- बालाजी वसंत कोरेकर यांनी तेथे जाउन अशोक हे बालाजी यांच्यात कामाला न आल्याच्या कारणावरुन बालाजी यांनी अशोक यांना जातीवाचक शिवीगाळ करुन हातातील कत्तीने अशोक यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक जेटीथोर यांनी दि. 12.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.