उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 

उस्मानाबाद  : घाटंग्री ग्रामस्थ- हणुमंत हाराळे हे दि.15 मार्च रोजी 22 वाजता शेतातील ज्वारी पिकाची राखन करत होते. यावेळी गावकरी अंकुश कुटुंबीय रमेश, बाबाशा, सिताराम, कालिंदा, अश्विनी यांनी जुन्या वादातुन हाराळे यांना  शिवीगाळ व धक्का बुक्की करुन काठीने मारहाण केली.  अशा मजकुराच्या हराळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143,144,147,149, 324,504, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : परंडा ग्रामस्थ- राहुल पाटील यांच्या सरनवाडी शिवार गट क्र. 84 मधील 1 हेक्टर क्षेत्रावरील उुस भाउु- उमाकांत यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी 13 मार्च रेाजी 10 वाजता कापुन चोरुन नेला. याचा जाब राहुन यांनी भाउ- उमाकांत यांस 16 मार्च रोजी दुपारी विचारला. यावर चिडुन जाउुन उुमाकांत यासह कुटुंबीयांनी राहुल यांना ठार मारण्याची धमकी देउुन, शिवीगाळ व धक्का बुक्की करुन काठीने मारहाण केली.  अशा मजकुराच्या राहुल यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 143,144,147,149, 324,504, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


फसवणुक

तुळजापुर : तुळजापुर येथील प्रतिक रोचकरी यांनी कोएक्सील केबल खरेदीसाठी ठाणे जिल्हयातील तुषार घाडगे यांना मे व जुन महिन्यात दोन ऑनलाईन व्यवहारात  एकुण 99,300 रुपये आगाउु दिले होते. परंतु तुषार घाडगे यांनी ठरल्याप्रमाणे साहित्य न पुरवता घेतलेले पैसेही परत न करता रोचकरी यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या 16 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भा.द.सं कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरी 

तुळजापुर  : खामसवाडी ता. उस्मानाबाद येथील शुक्राचार्य गुळवे यांनी त्यांची हिरो एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र.एम.एच.25 ए.आर. 8477 ही दि.10 मार्च रोजी रात्री हॉटेल मातोश्रीच्या वाहनतळात लावली होती. ती मोटार सायकल 12 मार्च रेाजी सकाळी त्या ठिकाणी न आढळल्याने ती मोटार सायकल अज्ञात व्यक्तीने चोरली असावी. अशा मजकुराच्या गुळवे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.