उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 

उस्मानाबाद : जिजाउनगर, उस्मानाबाद येथील- स्वप्निल लक्ष्मण जाधव यांची टिव्हीएस रेडॉन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्यु 9860 आणि इतर दोन व्यक्तींच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 12 जेई 4753 व एचएफ डिलक्स मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 9539 अशा अंदाजे 75,000 ₹ किंमतीच्या तीन मोटारसायकल दि. 09.09.2022 रोजी 21.30 वा. पुर्वी आर्य समाज मंदीराजवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या स्वप्निल जाधव यांनी दि. 10.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : भुम तालुक्यातील बुरुडवाडी येथील- अशोक जयराम बरकडे व वरुड येथील- विकास नाना टेकाळे यांसह अन्य दोन व्यक्तींनी दि. 09.09.2022 रोजी 01.00 वा. सु. बुरुडवाडी येथील- ऋषीकांत सर्जेराव शिरगारे यांच्या घरासमोर येउन पार्टीकरीता किराणा सामान मागीतले. यावर शिरगारे यांनी एवढ्या मध्यरात्री दुकान उघडण्यास नकार दिला असता त्या चौघांनी दुकान उघडले नाहीतर ते पेटवून देण्याची धमकी शिरगारे यांना दिली असता शिरगारे यांनी त्यांचे बोलने मनावर घेतले नाही. यावर शिरगारे यांनी सकाळी 06.00 वा. सु. घराशेजारील दुकानाकडे गेले असता त्यांचे दुकान जळून खाक झालेले त्यांना दिसले. किराणा सामान न दिल्याचा राग मनात धरुन नमूद लोकांनी शिरगारे यांचे दुकान पेटवून देउन त्यांचे अंदाजे 3,00,000 ₹ चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या ऋषीकांत शिरगारे यांनी दि. 10.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435, 461, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.