उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 

वाशी  : सरमकुंडी येथील तुकाराम कांबळे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप दि.9-13 मार्च दरम्याण अज्ञात व्यक्तीने तोडुन घरातील 20 ग्रॅम सुवर्ण दागिणे व 5,000 रुपये रोख रक्कम चोरुन नेली.  तर दुस-या घटनेत घाट पिंपरी येथील अभिमन्यु कदम यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप दि.14 मार्च रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने तोडुन घरातील 48 ग्रॅम सुवर्ण दागिणे व 9,000 रुपये रोख रक्कम चोरुन नेली असल्याने  भा.दं.सं. कलम-454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : तांदुळवाडी येथील संजय अडसुळ यांनी फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या काळात त्यांच्या खडी केंद्रातील विदयुत मीटर मध्ये छेडछाड करुन तसेच मीटरमागील वायरवर आकडा टाकुन सुमारे 4,63,100 रुपये किंमतीची 43,966 युनिट वीज चोरली. यावरुन उस्मानाबाद येथील विदयुत अभियंता प्रदिप मोरे यांनी 15 मार्च रोजी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन विदयुत कायदा कलम 135,138 अंतर्गत गुन्हा नोंदवला.  

 
फसवणूक 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील बस स्थानकासमोरील मे.नायगावकर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानातील एका औषधाचा नमुना 27 डिसेंबर 2019 मध्ये अन्न व औषध प्रशासनाने परिक्षण कामी जप्त केला होता. या औषधात भेसळ असल्याचा अहवाल औरंगाबाद येथील प्रयोग शाळेतुन नुकताच प्राप्त झाला आहे. यावरुन मुंबई येथील अन्न्‍ व औषध प्रशासनाच्या विलास दुसागे यांनी 15 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  दुकान चालक  मुकेश नायगावकर,  राठी एजेन्सिज-मुंबई, स्वस्तीक आयुर्वेद-बंगलोर, केडी आर्या फार्मा – केरळ राज्य यांच्याविरुध्द भा.द.सं कलम 420 सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

ढोकी  : येवती येथील  ज्ञानेश्वर हुबाले व भाउ(बंद सुभाष हुबाले या दोन्ही कुटुंबातील जुना वाद  दिनांक 14 मार्च रोजी 20.00 वा ऊफाळुन आला. यात दोन्ही कुटुंबीयांनी परस्पराच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व धक्का बुक्की करुन काठी दगडाने मारहाण केली.  अशा मजकुराच्या दोन्ही कुटुंबीयांनी दिलेलया दोन प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 324,504,506, 34 अंतर्गत दोन गुन्हे  नोंदवले आहेत.