उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 

कळंब  : समो चौक, कळंब येथील- अशोक मारुती पवार यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 7520 ही दि. 15.12.2022 रोजी 14.00 ते 15.00 वा. दरम्यान सुमो चौकातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक पवार यांनी दि. 15.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : वृध्दावननगर, उमरगा येथील- युसूफ शब्बिर गुल्ला व शिवपुरी रोड, उमरगा येथील- राम केशवराव नागदे या दोघांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीच्या अनुक्रमे हिरो होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 0404 व स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 ई 2254 या दोन मो.सा. दि. 10- 11.12.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या युसूफ मुल्ला यांनी दि. 15.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.