उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
उमरगा : दत्तनगर, लातूर येथील- अंजली यादवराव माने, वय 63 वर्षे या दि. 02.12.2022 रोजी 15.00 वा. सु. उमरगा बस आगारातील उमरगा ते अक्कलकोट जाणाऱ्या बस क्र. एम.एच. 20 बीएल 0150 मध्ये चढतअसताना श्रीमती माने यांच्या अंगावरील अंदाजे 55,000 ₹ किंमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण गंठण गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या अंजली माने यांनी दि. 04.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भूम : चिंचपुर (ढगे), ता. भुम येथील- अनुसया ढगे यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी अज्ञात व्यक्तीने दि. 03.12.2022 रोजी 01.30 ते 04.00 वा. दरम्यान उघडून घरात प्रवेश करुन आतील कपाटातील सुवर्ण- चांदीचे दागिने व 10,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 60,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अनुसया ढगे यांचा पुतण्या- अंकुश ढगे, रा. चिंचपुर (ढगे) यांनी दि. 04.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रहदारिस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा : तुरोरी, ता. उमरगा येथील- संतोश शंकरराव माळी हे दि. 04.12.2022 रोजी 13.10 वा. सु. उमरगा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर आपल्या ताब्यातील ॲपे रीक्षा क्र. एम.एच. 25 एन 0996 हा रहदारीस धोकादायकरित्या उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.