उस्मानाबाद जिल्ह्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
तुळजापूर : सीएमएस इन्फो सिस्टीम लि., सोलापूर कंपनीचे प्रतिनिधी- महादेव ज्ञानदेव ढगे, रा. काक्रंबा यांनी दि. 26 मे रोजी 13.30 14.07 वा. तुळजापूर येथील दोन एटीएम यंत्रातील एकुण 28,07,000 ₹ रक्कम बँकेच्या संमतीशिवाय परस्पर काढून त्या रकमेचा अपहार करुन बँकेची व कंपनीची फसवणूक केली. अशा मजकुराच्या सीएमएस इन्फो सिस्टीम लि., सोलापूर कंपनीचे व्यवस्थापक- सुहास व्यंकटराव कांबळे यांनी दि. 30 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : ऊसतोड कामगार पुरविण्याच्या मोबदल्यात 1) दिगंबर मुंढे, रा. दहिफळ, ता. केज 2)वचीष्ठ तांदळे 3) अंकुश तांदळे 4) नवनाथ तांदळे, तीघे रा. हिंगणी (खुर्द), ता.बीड 5) तुळशीराम गायकवाड 6) अनिल गायकवाड, दोघे रा. रुई, ता. वाशी या सर्वांनी जून- 2020 ते एप्रिल- 2022 या कालावधीत शिराळा, ता. परंडा येथील ऊजल मुसा शेख व शंकर घुबडे या दोघांकडून युपीआय प्रणालीद्वारे तसेच रोख अशी एकुण 15,82,000 ₹ रक्कम आगाउ घेतली. त्यानुसार ते ऊसतोड कामगार पुरवत नसल्याने शेख व घुबडे यांनी त्या सर्वांकडे आगाउ घेतलेल्या पैशाची वेळोवेळी मागणी केली असता ते न देता त्यांनी शेख व घुबडे यांना शिवीगाळ करुन पैसे मागीतल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अफजल शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध गुन्हे
शिराढोण : रांजणी, ता. कळंब येथील दत्तात्रय अंबऋशी सौदागर यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एयु 3815 ही दि. 25 मे रोजी 06.00 वा. सु. त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दत्तात्रय सौदागर यांनी दि. 30 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.