चोरीच्या विदयुतपंपासह दोघे आरोपी 24 तासांत अटकेत
मुरुम : आलूर ग्रामस्थ- जयपाल गहिरवार यांच्या शेत विहीरीतील 5 अश्वशक्ती क्षमतेचा विदयुत पंप दि. 6-7 मार्च दरम्याणच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याने दि. 27 मार्च भा.द.स कलम 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदला आहे.
तपासादरम्याण सपोनि- माळी यांच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली कि, या गुन्हयात जवळगा (केसर) येथील विरभद्र धुळे व शरणाप्पा बिराजदार या दोघांचा सहभाग असु शकतो. यावरुन पेालीस पथकाने त्या दोघांना आज दि. 30 मार्च रोजी ताब्यात घेउन तपास केला असता या चोरीतील विदयुतपंप त्यांच्या ताब्यात आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
मालमत्तेविरुध्दचे गुन्हे
नळदुर्ग : जळकोट ग्रामस्थ- शामल सोनकांबळे यांच्या घरासमोरच्या शेडमधील प्रत्येकी एक शेळी, बोकड व कोकरु असे दि. 28-29 मार्च दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.