तुळजापूर :  मटन खाल्याच्या कारणावरुन बापाकडून मुलीचा खून 

 

नळदुर्ग  : तुळजापूर तालुक्यातील कार्ला ग्रामस्थ- गणेश झंपण भोसले व मिराबाई गणेश भोसले या दोघा पती- पत्नींनी दि. 18.09.2022 रोजी 17.00 वा. सु. कार्ला येथे त्यांची मुलगी- काजल मनोज शिंदे, वय 22 वर्षे हिस कुत्र्याने मटन खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन पिता- गणेश भोसले यांनी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडून तीला गंभीर जखमी केले.

 यावेळी काजल हिचे नातेवाईक- विशाल जयराम भोसले यांनी काजल हिस जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे घेउन जात असताना काजल ही मयत झाली. तसेच गणेश भोसले व मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे, रा. कार्ला यांसही ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मनोज सुनिल शिंदे यांनी दि. 19.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळी तुळजापूर उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील यांसह नळदुर्ग पो.ठा.चे सपोनि- श्री. सिध्देश्वर गोरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि- सिध्देश्वर गोरे हे करत आहेत.

 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा दाखल

येरमाळा : शेलगाव (ज.), ता. कळंब येथील- विठ्ठल अनिल तवले यांनी दि. 17.09.2022 रोजी 19.30 वा. सु. तेरखेडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 च्या उड्डान पुलाखालील रस्त्यावर आपल्या ताब्यातील टेम्पो वाहन क्र. एम.एच. 42 एम 5641 हे रहदारीस धोकादायकरित्या उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 रस्ता अपघात

 नळदुर्ग : सोलापूर येथील- शिवलिला चनबसप्पा गुडोडगी यांनी दि. 11.09.2022 रोजी 09.30 वा. सु. नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर कार क्र. एम.एच. 40 बीई 1687 ही निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणारे तुळजापूर तालुक्यातील होर्टी ग्रामस्थ- बाशा अमिरोद्दीन पिंजारी, वय 69 वर्षे यांना पाठीमागून धडकली. या अपघातात बाशा पिंजारी यांच्या डाव्या पायाच्या नडगीचे हाड मोडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बाशा पिंजारी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दि. 18.09.2022 रोजी दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.