उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

ढोकी  : तडवळा येथील ग्रामस्थ सुरेश रामा पवार यांची राहते घरासमोर लावेलेली मोटार सायकल मारुती सुझ्ुकी ईको स्टार -5  क्रमांक एम  एच  25 ए एस 8430 हि  दिनांक 12 ते 13.03. 22 चे मध्यरात्री  अज्ञात चोरटयांनी चोरुन नेली. यावरुन  भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :  बारुळ ता.तुळजापुर येथील श्री बाळेश्वर विद्यालयातील बांधकामासाठी ठेवलेल्या साहित्यातील एक किलो लि. क्षमतेच्या दोन पाणी टाक्या , 19 सिमेंट पोती,  70 मीटर विज वायर, लोखंडी सळईचे तीन  गठठे असे साहित्य दिनांक 04.01.2022 रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या शाळा कर्मचारी तानाजी रणदिवे यांच्या 14 मार्च रोजीच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : कनकनाथवाडी येथील गा्रमस्थ यांचे राहते घराचे चॅनेल गेटची एका बाजुची लोखंडी पटटी दिनांक 14 मार्च रोजी दुपारी  एक वाजता तोडुन घरातील कपाटात ठेवलेले 70 ग्राम सुवर्ण दागिण्यासह 60 हजार रुपये रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454,380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 

कळंब : कळंब येथील चंद्रभान तांबडे यांच्या मोबाईल फोनवर दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरुन बोलणा-या त्या अज्ञात व्यक्तीने के्रडीट कार्डची उधारी  मर्यादा वाढवुन देण्याचे आमीष दाखवुन तांबडे यांचेकडुन के्रडीट कार्ड क्रमांकासह इतर गोपनीय माहीती व आलेला ओटीपी  विचारला. यावर  ताबंडे यांनी काही एक विचार न करता त्या अज्ञात व्यक्तीस ती गोपनीय माहिती सांगितली असता  दोन व्यवहारांत त्यांच्या बँक खात्यातील एकुण 1,26,000/- रुपये  अन्य खात्यात स्थलांतरीत झाले.अशा मजकुराच्या  तांबडे यांच्या  प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 420 सह आयटी ॲक्ट कलम 66  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.