उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे 

 

परंडा  : दहीफळ, ता. वाशी येथील रामहरी दत्तु सुके, वय 55 वर्षे यांनी दि. 25 मे रोजी 20.30 वा. सु. भूम- वारदवाडी रस्त्यावरील शेखापुर फाटा येथे त्यांची मोटारसायकल लावली असता त्या मो.सा. ला 27 ग्रॅम सुवर्ण दागिने, 20,000 ₹ रक्कम व एक भ्रमणध्वनी असे साहित्य असलेली पिशवी अडकवलेली तीन अनोळखी पुरुषांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामहरी सुके यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : पोफल, राज्य कर्नाटक येथील सुनंदा मल्लीकार्जुन कंबार, वय 42 वर्षे या दि. 04.03.2022 रोजी 15.00 ते 16.00 वा. दरम्यान लातुर- कलबुर्गा या बसने किल्लारी- उमरगा असा प्रवास करत होत्या. दरम्यान गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पिशवितील 25 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 4,000 ₹ रक्कम सुनंदा यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुनंदा कंबार यांनी दि. 26 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : चिंचोली, ता. तुळजापूर येथील अप्पाराव किसन कदम व महादेव बब्रुवान कदम यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 26 मे रोजी 01.00 ते 04.00 वा. दरम्यान तोडून अप्पाराव कदम यांच्या घरातील 17 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 30,000 ₹ रक्कम आणि महादेव कदम यांच्या घरातील 22 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व  55,000 ₹ रक्कम असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या अप्पाराव कदम यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.