उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 

तुळजापूर  : चिंचोली, ता. तुळजापूर येथील महादेव विठ्ठल दंदाडे यांनी दि. 25.02.2022 रोजी 10.00 वा. सु. ग्रामसभेत गावकरी- ऋषिकेश अशोक ढवळे याची समाज मंदीरासमोरील पानटपरी काढण्याचा प्रश्न मांडला. यावेळी चिडून जाउन  ऋषिकेश यांचा भाऊ- सौरभ अशोक ढवळे यांसह गावकरी- संतोष चौधरी, कंचिनाथ बनसोडे, बालाजी बोराटे, जीवन कदम या सर्वांनी महादेव दंदाडे याना जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धाउन जाउन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव दंदाडे यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 504, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : पारगाव, ता. वाशी येथील जावेद शब्बीर पठाण यांनी आपल्या मिनीट्रक मधील डिझेल टाकीत साखर टाकल्याचा जाब गावकरी- अनिकेत बाबासाहेब हारे यांना दि. 26.02.2022 रोजी 08.00 वा.सु. गावातील ‘बाबा टायर वर्क्स’ दुकानासमोर विचारला असता हारे यांनी चिडून जाउन जावेद पठाण यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या जावेद पठाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : बालाजीनगर, उमरगा येथील महेश सिद्दराम ईगवे हे पत्नीसह दि. 25.02.2022 रोजी 16.00 वा. सु. गल्लीत पाणीपुरी खात होते. यावेळी महेश यांचे नातेवाईक- तेजाबाई उगडे, आकाश उगडे, अमोल, शिंगनाथ, सोनाली इगवे सर्वांनी सोनाली यांच्या मुलांना पाणीपुरी खाण्यासाठी न आणल्याच्या कारणावरुन महेश ईगवे यांना शिवीगाळ करुन कोयता, वीट, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महेश ईगवे यांनी दि. 26.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.