उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना 

 

तामलवाडी : देवकुरळी, ता. तुळजापूर येथील मल्लीकार्जुन भानुदास जाधव यांसह त्यांचा मुलगा- ज्योतीबा या दोघांनी शेतजमीन मोजणीच्या कारणावरुन दि. 07.02.2022 रोजी 21.00 वा. सु. देवकुरळी शिवारात भाऊबंद- दत्तात्रय किसन जाधव यांसह त्यांची पत्नी- सुरेखा व मुलगा- विनायक यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने सत्तुर, कुऱ्हाडीने मारहान करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा जाधव यांनी दि. 08 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : नाईचाकुर, ता. उमरगा येथील नामदेव दिलीप पवार, वय 45 वर्षे यांनी भाऊबंद- दगडु दत्तु पवार यांच्या शेतातून ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर नेला होता. या कारणावरुन दगडू पवार यांसह त्यांची पत्नी- चंद्रकला, मुलगा- कांत व अमीत अशा चौघांनी दि. 07.02.2022 रोजी 22.30 वा. व दुसऱ्या दिवशी सकाळी 08.00 वा. सु. नामदेव पवार यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नामदेव पवार यांनी दि. 08 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भूम  : चिंचोली, ता. भुम येथील ग्रामस्थ- बालाजी शिर्के, औदुंबर वारे, सोमनाथ वारे, सुग्रीव वारे, रमेश साळुंखे, शिवलींग शिर्के, दिलीप शिर्के, एकनाथ वारे, रणजित साळुंखे, गौतम वारे, रमेश वारे अशा अकरा व्यक्तींनी पुर्वीच्या वादातून दि. 04.02.2022 रोजी 22.30 वा.सु. गाव‍ शिवारात गावकरी- तात्यासाहेब लिंबराज वारे, वय 32 वर्षे यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन तलवार डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या तात्यासाहेब वारे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह शस्त्र कायदा कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.