उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 

शिराढोण  : करिमनगर, शिराढोन येथील सिराजोद्दीन युनूस खतीब यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 23- 24 मे रोजी दरम्यानच्या रात्री तोडून घरातील सुवर्ण दागिने व 10,000 ₹ रक्कम असा एकुण 17,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सिराजोद्दीन खतीब यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : मोरखंडी, ता. बस्वकल्याण, जि. बिदर येथील व्यंकट करबसप्पा मुळे हे वारपत असलेली हिरो होंडा मोटारसायकल क्र. एम.एच. 24 डब्ल्यु 3918 ही दि. 22 मे रोजी 13.00 ते 14.00 वा. दरम्यान नारंगवाडी येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या व्यंकट मुळे यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : पवारवाडी, ता. उस्मानाबाद येथील संतोष शिवाजी मुंडे यांची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1386 ही दि. 23 मे रोजी 15.30 वा. सु. तेर येथील साप्ताहीक बाजारातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतोष मुंडे यांनी दि. 24 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.