उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना 

 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद येथील बिसिमल्ला गुलाब शेख, वय 60 वर्षे या दि. 20 मे रोजी 12.30 वा. सु. बस स्थानक, उस्मानाबाद येथील औसा बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे सुवर्ण गंठण शेख यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या बिसिमल्ला शेख यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : आवाडशिरपुरा, ता. कळंब येथील गट क्र. 51 व 52 मधील 1) आशीलकुमार आवाड यांच्या 7 एकर ऊस पिक, एक तुषार सिंचन संच, 2) धनराज आवाड यांच्या एक तुषार सिंचन संच 3)देवदत्ताआवाड यांच्या 1.5 एकर ऊसाचे पाचट कुटीला दि. 20 मे रोजी दुपारी 14.00 वा. सु. सौदणा (आंबा), ता. कळंब येथील उध्दव अनिरुध्द गायकवाड यांनी आग लावून नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या आशीलकुमार आवाड यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : वाशी ग्रामस्थ- रेणूकादास बाबुराव टेकाळे यांच्या गट क्र. 874 मधील शेतात मळणी करुन ठेवलेले 12 क्विंटल राजमा पिक दि. 19- 20 मे रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या रेणुकादास टेकाळे यांनी दि. 21 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.