उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे
मुरुम : भुसणी, ता. उमरगा येथील- मारोती दगडु औटे, वय 53 वर्षे यांच्या भुसणी गट क्र. 258 मधील शेत तळ्यातील लक्ष्मी कंपनीची पानबुडी विद्युत मोटार व 30 फुट वायर असा एकुण 7,000 ₹ किंमतीचे दि. 04.11.2022 रोजी 18.00 ते दि. 05.11.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मारोती औटे यांनी दि. 05.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : व्होर्टी, ता. तुळजापूर येथील- विकास दगडु भोसले, वय 30 वर्षे यांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीची होंडा युनीकॉर्न मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 6527 ही दि. 04.11.2022 रोजी 01.00 ते 05.00 वा. दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विकास भोसले यांनी दि. 05.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : रामकुंड, ता. भुम येथील- विश्वंभर अंगद हाके, वय 28 वर्षे यांच्या गावातील बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 04.11.2022 रोजी 10.00 ते दि. 05.11.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान तोडून 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 20 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण व 6,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 69,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या विश्वंभर हाके यांनी दि. 05.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.