उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 

येरमाळा : पानगाव, ता. कळंब येथील सरपंच- माणिक  विठ्ठल ओव्हाळ  हे आपल्या कुटूंबीयांसह घरा समोरील ओठ्यावर दि.16.01.2023 रोजी 20.00 वा. सु. बसले होते. यावेळी गावकरी नारायण पवार, दशरथ पवार, दिगंबर पवार, अनिल काळे यांसह अन्य 4 व्यक्तींनी तेथे येउन भुखंड वादाचे कारणावरून माणिक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी माणिक यांची पत्नी त्यांच्या बचावास आल्या असता त्यांच्या गळ्यातील अंदाजे 70,000 ₹ किंमतीचे 20 ग्रॉम वजनाचे सुवर्ण गंठण जबरीने चोरून नेले. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या माणिक ओव्हाळ  यांनी दि. 21.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : किणी, ता. उस्मानाबाद येथील- नारायण पोपट लंगाळे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो स्पेलंन्डर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1299 ही दि. 16.01.2023 रोजी 16.00 वा. दरम्यान आठवडी बाजार तेर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नारायण लंगाळे यांनी दि. 21.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : नवी मुबंई येथील- लक्ष्मी नामदेव नारायणकर ह्या दि.14.01.2023 रोजी 09.45 ते दि.15.01.2023 रोजीचे पहाटे 05.00 वा. सु. मुबंई ते लातुर ट्रॅव्हल्सने प्रवास करत होत्या. मुंबई ते येडशी दरम्यान लक्ष्मी यांच्या पर्समधील 10,000 ₹ रोख रक्कम व 77 ग्रॉम वजनाचे सुवर्ण दागिणे असा एकुण अंदाजे 2,34,500 ₹ माल अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत लक्ष्मी यांच्या नकळत चोरून नेलो. अशा मजकुराच्या लक्ष्मी नारायणकर यांनी दि. 21.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.