उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

शिराढोण  : नागझरवाडी, ता. कळंब येथील- दयानंद रामेश्वर माळी यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची टिव्हीएस स्टार सिटी प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएबी 8816 ही दि. 06.11.2022 रोजी 22.00 ते दि. 07.11.2022 रोजी 05.00 वा. दरम्यान माळी यांच्या गावातील राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दयानंद माळी यांनी दि. 15.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : शेकापुर, ता. उस्मानाबाद येथील- किशोर सुरेश शेंडगे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 3546 ही दि. 06.11.2022 रोजी 17.00 ते 18.30 वा. दरम्यान उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजार परिसरातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या किशोर शेंडगे यांनी दि. 15.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : गंभीरवाडी, ता. कळंब येथील- कुंडलीक तुकाराम भराटे यांच्या गंभीरवाडी गट क्र. 378 मधील शेतातील 9 क्विंटल सोयाबीन दि. 05.11.2022 रोजी 06.00 ते 07.00 वा. दरम्यान गावकरी- हनुमंत काळे, श्रीमंत काळे, सुनीता काळे, लता काळे व महादेव गडगुळ या सर्वांनी संगणमताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कुंडलीक भराटे यांनी दि. 15.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 वाशी  : महावितरणच्या यशवंडी येथील उपकेंद्रातील वरिष्ठ तंत्रज्ञ- अशोक पोपट शिरतोडे हे दि. 15.11.2022 रोजी 12.00 वा. सु. उपकेंद्रात कर्तव्यावर असताना विजोरा, ता. वाशी येथील- महादेव कोंडीबा जाधव यांनी तेथे जाउन अशोक शिरतोडे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे महादेव जाधव यांनी अशोक शिरतोडे यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या अशोक शिरतोडे यांनी दि. 15.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.