उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
तुळजापुर : वेताळ नगर तुळजापुर येथील स्वराज कदम हे दि. 22 मार्च रोजी 21.30 वाजता तुळजापुर येथील एका पेट्रोलियम विक्री केंद्रात होते. यावेळी गावकरी - ओंकार इंगळे हे स्वराज यांच्या अंगावर थुंकले असता स्वराज यांनी त्यास हटकले. यावर चिडुन जाउन ओंकार इंगळे यांसह धीरज व गणेश इंगळे या तिघांनी स्वराज यांना ठार मारण्याच्या धमकी देउन, शिवीगाळ करुन लाथा बुक्याने मारहाण केली. यावेळी स्वराज यांच्या बचावास त्यांचे पिता- समाधान हे सरसावले असता गणेश इंगळे यांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केला असता तो वार समाधान यांनी हातावर झेलल्याने त्यांचे देान्ही हातावर जखम झाली. अशा मजकुराच्या स्वराज कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 307,504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : भाउबंदाचे शेत नांगरणीच्या कारणावरुन खानापुर येथील साखरबाई जनार्धन नकाते यांचा दि. 22 मार्च रोजी 18.00 वाजता त्यांचा मुलगा- गोकुळ व सुन– राणी यांच्या सोबत शेतामध्ये वाद झाला. यावर नमुद पती- पत्नी यांनी साखरबाई यांना शिवीगाळ करु, जमीनीवर पाडुन लाथा बुक्याने मारहाण केल्याने साखरबाई यांचे पुढील दात पडले आहेत. अशा मजकुराच्या साखरबाई यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 325 , 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : कळंब येथील राजा काळे हे पत्नी- कमलबाईसह दि. 27 फेब्रुवारी रोजी 11.00 वाजता मजुरी कामानिमीत्त कळंब येथील मोंढयात होते. यावेळी त्यांच्या पत्नीचा डिकसळ ग्रामस्थ्- किसन गायकवाड यांच्यासोबत वाद झाला असता किसन गायकवाड यांसह त्यांचे मुलगे-प्रशांत व श्रीकांत यांनी राजा काळे यांच्या जबडयावर लोखंडी गज मारल्याने राजा यांचे तीन दात पडले. अशा मजकुराच्या राजा काळे यांनी दि. 23 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम 325, 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे दोन गुन्हे दाखल
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील बालाजी ससाने यांची मोटार सायकल क्र. एम.एच. 24 वाय 8874 ही दि. 21 मार्च रोजी 18.30 वाजता शहरातील एका हॉटेलसमोरुन चोरीस गेली. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : सराटी येथील अक्षय सुरवसे व सुकेश दुपारगुडे दि. 22-23 मार्च दरम्याणच्या रात्री घरासमोरील अंगणात झोपले असताना त्या दोघांच्याही उशाला असलेले देान स्मार्ट फोन व पैशाचे दोन बटवे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.स कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.