उस्मानाबादेत चोरीचे सत्र  सुरुच , नागरिकांचा जगता पहारा 

 

उस्मानाबाद  : उस्मानाबादेत चोरीचे सत्र  सुरुच आहे. त्यामुळे  नागरिकात घबराट पसरली असून,  नागरिकांचा जगता पहारा सुरु आहे. 

वरुडा, ता. उस्मानाबाद येथील रंगनाथ दासु गंगावणे हे दि. 02- 09.02.2022 रोजी दरम्यान आपले घर कुलूप बंद करुन बाहेर गावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील सोयादाने 20 पोती चोरुन नेली. अशा मजकुराच्या रंगनाथ गंगावणे यांनी दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : काटगाव, ता. तुळजापूर येथील ग्रामस्थ- महम्मद बाशा मणीयार यांच्या गट क्र. 392 मधील शेत विहिरीतील रत्ना पानबुडी विद्युत पंप दि. 11.02.2022 रोजी 00.30 ते 05.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या महम्मद मणीयार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 अपघात

उस्मानाबाद : उपळा (मा.), ता. उस्मानाबाद येथील बाळासाहेब किसन लोहार, वय 45 वर्षे हे दि. 04.02.2022 रोजी 14.30 वा. सु. प्रादे‍शीक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डी 3405 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 25 एएस 9437 ही निष्काळजीपने चालवल्याने लोहार यांच्या मो.सा. ला पाठीमागून धडकली. या अपघातात लोहार यांच्या डोक्यास, डाव्या पायास गंभीर मार लागून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या सोमनाथ बाळासाहेब लोहार यांनी दि. 11.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.