उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी 

 

येरमाळा  : मालेगाव, जि. नाशिक येथील- फकीरा ईस्माईल शेख, वय 50 वर्षे हे कुटूंबीयांसह दि. 03.11.2022 रोजी मालेगाव ते हैद्राबाद असा  मिनी ट्रक क्र. एम.एच. 18 एए 9141 ने प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान मिनी ट्रक 00.30 वा. सु. येरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ थांबला असता मिनी ट्रकवरील त्यांच्या 5 बॅग त्यांत असलेल्या 28,000 ₹ रक्कम, एक मोबाईल फोन व कपड्यासह अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या.  अशा मजकुराच्या फकीरा शेख यांनी दि. 03.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
ढोकी  : ढोकी येथील दत्त टेकडीवरील मंदीराच्या बाजुस असलेल्या सौरउर्जा पोलवरील अंदाजे 9,500 ₹ किंमतीची 12 वोल्ट- 40 एएच बॅटरी दि. 03.11.2022 रोजी 17.45 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या राजपाल गुणवंतराव देशमुख, रा. ढोकी यांनी दि. 03.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
लोहारा  : लोहारा येथील- अंबादास बाळकृष्ण पोतदार, वय 40 वर्षे यांच्या लोहारा येथील ‘कृष्णा ज्वेलरी’ या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 03.11.2022 रोजी 02.38 ते 02.40 वा. दरम्यान गॅस कटरने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अंबादास पोतदार यांनी दि. 03.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.