उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी 

 

तुळजापूर  : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- सिमा विद्यासागर क्षिरसागर या दि. 14.09.2022 रोजी 16.00 वा. सु. तुळजापूर बस स्थानकामागील मार्केट मध्ये असताना गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने क्षिरसागर यांच्या पिशवीतील 50,000 ₹ रोख रक्कम त्यांच्या नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या सिमा क्षिरसागर यांनी दि. 14.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : सांगवी (मार्डी) येथील नागोबा मंदीराजवळील महावितरणच्या उपकेंद्रातुन अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे 5 फुटी लांबीचे व 15 कि.ग्रॅ. वजनाचे असे तांबा धातुचे सहा गज दि. 13.09.2022 रोजी 23.00 ते 24.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या महावितरणचे कर्मचारी- राहुल जोशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 14.09.2022 रोजी भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : भिमनगर, वाशी येथील- समाधान नारायण गायकवाड यांच्या वाशी गट क्र. 33 (स) मधील शेत विहीरीजवळील सौर प्रकल्पाचे कंट्रोलर बॉक्स व 80 फुट केबल असे एकुण 39,000 ₹ किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने दि. 31.08.2022 रोजी 11.00 वा. ते दि. 01.09.2022 रोजी 09.00 वा. दरम्यान चोरुन नेले. अशा मजकुराच्या समाधान गायकवाड यांनी दि. 14.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

 येरमाळा  : घनसांगवी, जि. जालना येथील- विजय श्रीराम चांगले हे दि. 08.09.2022 रोजी 11.30 वा. सु. येरमाळा येथील एस.बी.आय. एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांना पैसे काढण्यासाठी तांत्रीक अडचन येत असल्याचे पाहून त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका अनोळखी पुरुषाने पैसे काढून देण्याचा बहाना करुन विजय चांगले हे एटीएम पिन टाकत असताना पाहुन त्या पुरुषाने चांगले यांच्या नकळत चांगले यांना त्यांच्या एटीएमच्या रंगसंगतीचे दुसरे एटीएम दिले. त्यानंतर त्या अनोळखी पुरुषाने चांगले यांच्या एटीमच्या सहायाने दि. 08- 12.09.2022 रोजी दरम्यान 5 व्यवहारांत त्यांच्या बँक खात्यातील एकुण 1,06,000 ₹ रक्कम काढून घेउन त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या विजय चांगले यांनी दि. 14.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.